‘शिवाय’मध्ये कुछ तो गडबड है!

शनिवार, 15 ऑक्टोबर 2016 (12:36 IST)
अभिनेता वीर दास याने अजय देवगणची निर्मिती असलेल्या शिवाय या चित्रपटात पाकिस्तानी कनेक्शन असल्याचा खुलासा केला आहे. प्रेक्षकांना बघण्यासारखे या चित्रपटात बरेच काही आहे. तसेच वीरदास या चित्रपटात पाकिस्तानी हॅकरची भूमिका साकारत आहे. 
 
वीरदासने या व्यतिरिक्त त्याच्या भूमिकेबाबत अधिक खुलासा केलेला नाही. त्याने एवढेच सांगितले की, तो पाकिस्तानी हॅकरची भूमिका करत असला तरी ती भूमिका नकारात्मक नाही. बॉक्स ऑफिसवर शिवाय चांगली कमाई करेल असा विश्वासही वीरदासने 
 
यावेळी व्यक्त केला. 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होत आहे. ‘शिवाय’चा सामना करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाशी होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा