सिध्दार्थची प्रेरणा!

बुधवार, 21 जानेवारी 2015 (12:50 IST)
लहानपणापासूनच सिध्दार्थ स्टाइलिंगचा चाहता आहे. त्यामुळेच मिलिंद सोमण आणि अर्जुन रामपाल त्याचे ऑल टाइम फेवरेट रोल मॉडेल आहेत. आता तर त्याला अमिताभ बच्चनच स्टाइलिंगनेही प्रभावित केलं आहे. साहजिकच त्याचे प्रयत्न असतात, ते आपल्या रोल मॉडेल्सच्या स्टाइलिंगमधून काही ना काही प्रेरणा घेण्याचे. पण आपली स्टाइलिंग साधी असेल याकडेच सिध्दार्थचा जास्त कटाक्ष असतो. सिध्दार्थच्या वॉर्डरोबमध्ये सगळ्यात जास्त ब्लू शेड्स आहेत. मग तो टी-शर्ट असो, की फॉर्मल शर्ट. पण जेव्हा फॉर्मल शर्टचा विषय येतो, तेव्हा मात्र त्याला एखादा काळ रंगाचा शर्टही कामी येतो, असं वाटतं. एखाद्या पार्टीत खाकी पँटवर स्ट्राइप्ड शर्ट घालणं त्याला आवडतं, त्याच्या मते, मुलांच्या वॉर्डरोबमध्ये ब्लू जिन्स, व्हाइट टी-शर्ट, जॅकेट्स, एक टक्सीडो सूट आणि फॉर्मल शूज जरूर असावेत. सिध्दार्थ घरातून घडय़ाळ, सनग्लास आणि शूजशिवाय कधीच निघत नाही. त्याला वाटतं की, मुलांसाठी लेअरिंग स्टाइल नेहमीच कामी येतो. एबरक्रॉम्बी अँड फिच हा त्याचा आवडता फरफ्यूम आहे. सिध्दार्थला ऋतूनुसारच कपडे घालायला आवडतात. जिममध्ये कित्तेक तास व्यायाम करणपेक्षा सिध्दार्थला फुटबॉल खेळणं आवडतं. व्यायामासाठी त्याला नेहमीच जिममध्ये जावं लागतं. प्रत्येक चार आठवडय़ांनी सिध्दार्थ आपला वर्कआऊट बदलतो. सिध्दार्थ नॉन-व्हेजेटेरिअन आहे. आणि प्रत्येक प्रकारची नॉन-व्हेजेटेरिअन डिश खाणं तो पसंत करतो. पण फिटनेसच्या कारणास्तव तो प्रोटिन्सयुक्त पदार्थच जास्त खातो. अत्यावश्यक तेवढं पाणीही जरूर पितो, पण जेव्हा केव्हा डार्क चॉकलेट पाहतो तेव्हा मात्र तचा स्वत:वरचा ताबा सुटतो. 
 

वेबदुनिया वर वाचा