काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका फॅशन शो आणि ब्रँड लाँचिंगसाठी ती प्रमुख पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिला सलमान खानच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, ‘सिंगल असलेल्या दोन व्यक्तींना तुम्ही हा प्रश्न विचारला आहे. सिंगल असणे आम्ही सेलिब्रेट करतो. आम्हा कोणी मिळाले नाही म्हणून आम्ही सिंगल नाही तर बाय चॉईस आम्ही सिंगल आहोत. गो सलमान.! गो सूश.!’ सुष्मिता ही सुद्धा सिंगल असून सुष्मिताने 2 मुली दत्तक घेऊन त्यांचे उत्तम संगोपन केले आहे. त्यामुळे सुष्मिताच्या उत्तराला दादच दिली पाहिजे.