एका ऑनलाईन पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, झीनतनं पुन्हा एकदा लग्न करायचं असल्याचं म्हटलंय. ‘होय मला पुन्हा एकदा लग्न करायचंय.. माझी दोन्हीही मुलं आता मोठी झाली आहेत.. त्यांच्याबद्दल आता मी निश्चित झालेय.. त्यामुळे आता मला स्वत:बद्दल विचार करण्याचा अधिकार आहे’ असं झीनतनं म्हटलंय.
झीनतनं 1985 मध्ये अभिनेता मजहर खानसोबत लग्न केलं होतं. 1998 साली मजहरचं निधन झालं. पण, मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, असंही झीनतनं स्पष्ट केलंय.
ती हरे रामा हरे कृष्णा, यादों की बारात, डॉन, कुर्बानी, लावारिस आणि दोस्ताना यांसारख्या सिनेमांतून प्रेक्षकांसमोर आली होती.