दरम्यान, एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांची भेट झाली होती. नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले होते. इंग्लंड दौर्यात अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत गेल्याचे उघड झाले होते. न्यूझीलंड दौर्यातही हे दोघे हातात हात घालून फिरत असल्याचे एका छायाचित्रात कैद झाले होते.तसेच नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात अनुष्का शर्मा विराटला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. अर्धशतक ठोकल्यावर विराटने अनुष्काला फ्लाईंग किस दिले होते.