मुलं आणि कुटुंबासह दिल्लीच्या या पाच ठिकाणांना भेट द्या

शनिवार, 1 जानेवारी 2022 (20:23 IST)
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे. जर आपल्याला कुटुंबासह हे  नवीन वर्ष खास बनवायचे असेल तरआपण सहलीला ही जाऊ शकता. तथापि, जर आपण कोरोना किंवा इतर कोणत्याही कारणामुळे प्रवास करू शकत नसाल, तर आपण आपल्या शहरातील किंवा आसपासच्या विशेष ठिकाणी जाऊ शकता. नवीन वर्षाच्या निमित्ताने, आज जोडीदार आणि मित्रांसोबत फिरण्यासाठी अनेक ठिकाणे असतील, परंतु यानिमित्ताने आपण मुलं आणि कुटुंबासह  फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर काही खास ठिकाणी जाऊ शकता. जर आपण राजधानीत रहात असाल, तर दिल्लीत किंवा आसपास अनेक ठिकाणे आहेत, जिथे नवीन वर्षाच्यानिमित्ताने  मुलांसह भेट देऊ शकता.
 
1 गार्डन ऑफ फाईव्ह सेंसेज -सईद-उल-अजैब, दिल्ली येथे गार्डन ऑफ फाइव्ह सेन्स आहे. हे उद्यान दिल्लीच्या प्रमुख पर्यटनाचा भाग आहे. हे उद्यान अनेक नैसर्गिक दृष्यांनी भरलेले आहे. येथे 200 हून अधिक आकर्षक आणि सुवासिक वनस्पती आहेत. 
 
2 नॅशनल रेल म्युझियम -हे लहान मुलांसाठी दिल्लीतील नॅशनल रेल म्युझियम  आहे, जेथे टॉय टेनवर प्रवास करून मुले तसेच मोठे देखील आनंदी होतात. हे राष्ट्रीय रेल संग्रहालय चाणक्यपुरी येथे आहे. सोमवार आणि सरकारी सुटी वगळता ते दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत खुले असते. प्रौढांसाठी 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट आहे. 
 
3 अॅडव्हेंचर आयलंड - दिल्लीचे अॅडव्हेंचर आयलंड हे मुलांच्या पर्यटनाचे सर्वात मोठे केंद्र आहे. दिल्ली अॅडव्हेंचर आयलंड देशभर प्रसिद्ध आहे. सामान्य ठिकाणांच्या तुलनेत हे थोडे महाग आहे. इथे तिकीट 500 रुपये आहे. मात्र, इथे मुलांना घेऊन गेलात तर त्यांना नक्कीच आनंद होईल. 
 
4 वर्ल्डस ऑफ वंडर वॉटर पार्क- हे नोएडा येथे आहे. हे विशेषतः मुलांसाठी डिझाइन केलेले आहे. या उद्यानात मुलांना अनेक ऍक्टिव्हिटी आणि मजेदार खेळ पाहायला मिळतील. 
 
5  दिल्ली हाट बाजार- मुलांना बरोबर घेतले आहे आणि त्यांनी चविष्ट खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला नाही तर सहल अपूर्ण वाटते. दक्षिण दिल्लीतील हाट बाजार पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात. चविष्ट स्ट्रीट फूड येथे उपलब्ध आहे. सकाळी 10 वाजल्यापासून आपण या हाट बाजारात जाऊन आपल्याला आवडते खाद्यपदार्थ घेऊ शकता.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती