युरोपमधला छोटासा देश : स्लोव्हाकिया

बुधवार, 15 एप्रिल 2020 (13:23 IST)
स्लोव्हाकिया हा मध्य युरोपमधला छोटासा देश आहे. एकेकाळी हा झेकोस्लोव्हाकियाचा भाग होता. 75 वर्षे या भूभागावर सोव्हियत युनियन म्हणजे सध्याच्या रशियाचे राज्य होते. 1990 मध्ये हा भाग सोव्हियत युनियनपासून वेगळा झाला आणि 1993 मध्ये तो झेक रिपब्लिकपासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला. ब्रातिस्लाव्हा ही या देशाची राजधानी आहे. 54,00000 एवढी या देशाची लोकसंख्या आहे. या देशातील लोक स्लोव्हाक भाषा बोलतात. झेक रिपब्लिक, पोलंड, युक्रेन, हंगेरी आणि ऑस्ट्रिया हे या देशाचे शेजारी आहेत.
 
स्लोव्हाकिया चारही बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. हा खूप छोटा देश आहे. स्लोव्हाकियाचा बराचसा भूभाग डोंगराळ आहे. देशाच्या उत्तरेला कारपाथियन पर्वतरांगा आहेत. टॅट्रा या इथल्या सर्वात उंच पर्वतरांगा आहेत. इथे उन्हाळ्यात खूप गरम होते तर थंडीत आर्द्रता बरीच जास्त असते. डॅन्यूबे, वाह आणि एचरॉन या इथल्या प्रमुख ना आहेत. या देशात अनेक प्रजातींचे पक्षी आहेत. अस्वल, लांडगे, रानमांजर, मिंक असे प्राणी  येथे आढळतात. या देशात विविधउत्पादनांची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते. धातूचे उत्पादन हा या देशातला प्रमुख उद्योग आहे. या देशात नैसर्गिक साधनसंपत्तीही भरपूर प्रमाणात आहे. स्लोव्हाकिया हा युरोपमधला श्रीमंत देश आहे. या देशात कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आहे. इथे एकत्र कुटुंबेही आहेत.
मधुरा कुलकर्णी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती