बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये अखेर करार झालाय

गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (16:32 IST)
युनायटेंड किंग्डम आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भातला एक करार निश्चित झाला आहे.
 
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी एक ट्वीट करून सांगितलं, "आपल्याकडे एक नवीन करार आहे, ज्यामुळे सारंकाही पुन्हा आपल्या नियंत्रणात येईल."
या कराराच्या मसुद्यावर अजूनही काम सुरू आहे, आणि या कराराच्या अंतिम स्वरूपाला युरोप तसंच युकेच्या संसदेची मंजुरी लागणारच आहे.
 
त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून अडकलेला ब्रेक्झिटचा, अर्थात ब्रिटनने युरोपमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती