आफ्रिकन फिश ईगल हे केनियाच्या 1400 कि.मी. क्षेत्रफळामध्ये विस्तारलेले पशुपक्षी अभ्यारण्य या परिसरात आहे. सिंह, चित्ता, तरस, लांडगा आणि हिंस्र आफ्रिकन हत्ती, जिराफ, शहामृग, झेब्रा, पाणघोडा, वानरे अशा वन्य प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी राखीव ठेवलेले हे अभ्यारण्य आहे.
स्वामी नारायण मंदिराला हिंदू लोक येतातच पण इतर धर्मीय लोकसुद्धा या मंदिराचे सौंदर्य पाहाण्यासाठी दूरदूरच्या गावाहून येतात. हे पाहून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते. हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी देवाचा वास असल्याबद्दल त्यांना खात्री पटते. या देवामध्येच ते आपला देव पाहतात. हे मंदिर हिंदूंचे असल्यामुळे अनेक हिंदू लोक या देवाला नवस बोलतात आणि त्यांची कार्यसिद्धी झाल्याबद्दल तेथील लोक सांगतात.