पुडुचेरी, तमिळनाडू-
तामिळनाडूमधील पुडुचेरी हे नैसर्गिक सौंदर्य, निर्मळ समुद्रकिनारे, सुंदर कॅफे आणि फ्रेंच-स्वादयुक्त खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. सप्टेंबर महिन्यात पुद्दुचेरीला भेट देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. प्रवासादरम्यान, तुम्ही पॅराडाईज बीच, अरबिंदो आश्रम, ऑरोविल, समुद्र किनारी प्रोमेनेड इत्यादींना भेट देऊ शकता.
अल्मोडा, उत्तराखंड-
हिल स्टेशनला भेट देण्याची योजना पावसाळ्यामुळे रखडली असेल, तर. सप्टेंबर महिन्यात उत्तराखंडच्या हिल स्टेशनला भेट देऊ शकता. अल्मोडाला भेट देण्याची योजना करू शकता. अल्मोडामध्ये तुम्ही नंदा देवी मंदिर, चिताई मंदिर, पाताल देवी मंदिर, मॉल रोडला भेट देऊ शकता. याशिवाय चांद राजवंशाच्या काळातील मल्ला पॅलेस, अल्मोडा प्राणीसंग्रहालय यासारख्या काही ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊ शकता.
कालिम्पॉंग, पश्चिम बंगाल-
पश्चिम बंगालमधील एक अनोखे हिल स्टेशन कालिम्पॉंगला तुम्ही भेट देऊ शकता. पूर्व भारतातील या लोकप्रिय पर्यटन स्थळामध्ये हिरवेगार दृश्य पाहायला मिळते. टी गार्डन, लेपचा म्युझियम, मेक फोरलेन चर्च, डॉ. ग्रॅहम होम, देवलो हिल, मोरन हाऊस, त्सोंगा गुंबा आणि दुरपिन मठ येथे आहेत ज्यांना भेट देता येते.