Diwali 2024: जवळच दिवाळी आली आहे सर्वजण साफसाईला लागले आहे. तुम्हाला माहीतच आहे की दिवाळी का साजरी केली जाते कारण दिवाळीलाच प्रभू श्रीराम माता सीताला घेऊन अयोध्या मध्ये आले होते. या दिवशी प्रभू श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते. तसेच तुम्हाला माहित आहे का? प्रभू राम आणि माता सीता यांचे स्वयंवर कुठे झाले ते आज आपण जाणून घेऊ या.
तसेच भगवान श्रीराम यांचे सासर नेपाळ मधील आहे. नेपाळमधील जनकपुरच्या नौलखा मंदिर हे प्रभू श्रीरामांचे सासर मानले जाते, कारण माता जानकीने आपले विवाह आधीचे जीवन इथेच व्यतीत केले होते. त्यांचा विवाह देखील मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासोबत इथेच झाला होता. नेपाळमधील जनकपुर मध्ये स्थित या प्राचीन मंदिराची वस्तू पाहून तुम्हाला जाणवेल की, याचा इतिहास श्री राम आणि माता सीता सोबत जोडलेला आहे.
नौलखा मंदिर कोणी बांधले?
श्रीराम आणि माता सीता यांनी ज्या मंदिरात विवाहानंतर सप्तपदी घेतले. त्या मंदिराचे नाव नौलखा आहे. जे नेपाळमध्ये वसलेले असून या मंदिराचे बांधकाम 1895 मध्ये सुरू झाले आणि 1911 मध्ये पूर्ण झाले. तसेच नौलखा मंदिर राजपुताना राणी वृषभानु कुमारी यांनी बांधले होते. त्यावेळी हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे नऊ लाख रुपये खर्च झाल्याचेही सांगितले जाते. त्यामुळेच या मंदिराचे नाव नौलखा ठेवण्यात आले.