भारतातील कर्नाटक राज्यातील बेंगळुरू पासून 180 किमी अंतरावर हसनंबा मंदिर आहे. जे देवीला समर्पित आहे.हे मंदिर फक्त दिवाळीमध्येच आठवडाभर उघडण्यात येते. तसेच दीप प्रज्वलित करून वर्षभरासाठी बंद करण्यात येते. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे हसनंबा मंदिर भारतातील एक मात्र असे मंदिर आहे, जे फक्त दिवाळीमध्ये उघडते.
पौराणिक आख्यायिका-
या मंदिराची पौराणिक आख्यायिका आहे की, अंधकासुर या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून अदृश्य होण्याचे वरदान मागितले होते. यानंतर त्याने पृथ्वीतलावावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भगवान शिवाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळी भगवान शिवाने अंधकासुराचा वध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या शरीरातून रक्ताच्या थेंबाने तो राक्षस पुन्हा जिवंत व्हायचा. शेवटी शिवाने आपल्या सामर्थ्याने योगेश्वरी देवीची निर्मिती करून राक्षसाचा संहार केला.