सातपुडा पर्वत हा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश यांच्या सीमा आहेत. तच उत्तर पश्चिमेस हा मांडवगड किल्ला आहे. येथे येताना खांडवा (मध्य प्रदेश), शिरपूर (महाराष्ट्र), इंदूर (मध्य प्रदेश) असून मांडव गडकडे येताना हिरवागार घाटरस्ता लागतो. पावसाळत तर हे दृश्य फारच बहारदार दिसते. मधूनच इंदूर खांडवा दरम्यान जाणार्या रेल्वेगाडीचे दर्शनदेखील घडते. मांडवगड या भव्य वास्तूचे ढोबळमनाने तीन भाग पडतात. दिल्ली द्वाराकडून उत्तरेकडील रॉयल एनक्लेव्ह आहे आणि पुढे मांडू गाव आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे रेवाकुंड आहे. रॉयल एनक्लेव्ह भागात बर्याच इमारती आहेत, हे सारे पाहण्यासाठी गाईड असणे आवश्यक असते. लाल-काळ्या दगडाची पार्श्वभूमी समजण्यासाठी गाईड फारच उपयोगी पडतो.
रूपमती महाल हा रूपमती राणीसाठी होता. तिच्यासाठी अकबर बादशहा मांडवगडावर चालून आला. तेथे दर्याखान कबर, हाथी महाल अशा दोन वास्तू आहेत. इंदूरपासून 115 कि.मी. अंतरावर मांडवगड आहे. इंदूर मध्यवर्ती ठेवून हे ठिकाण पाहणे सोयीचे पडते.