लक्षद्वीप मधील सुंदर बेट

मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (07:30 IST)
Lakshadweep Tourism भारतातील केंद्रशासित प्रदेशांपैकी एक लक्षद्वीप हे अतिशय सुंदर आणि रमणीय ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच लक्षद्वीप मधील मिनिकॉय बेट हे अत्यंत रमणीय आहे. लक्षद्वीपच्या 36 लहान बेटांमध्ये या बेटाचा याचा समावेश होतो. हे बेट किनारपट्टीपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर आहे.
 
मिनिकॉय बेट-
लक्षद्वीपमध्ये भेट देण्यासारखे सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे मिनिकॉय बेट आहे. लक्षद्वीपच्या 36 लहान बेटांमध्ये याचा समावेश आहे. लोक या बेटाला स्थानिक भाषेत मलिकू देखील म्हणतात. हे किनारपट्टीपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर आहे. येथे सुंदर असे कोरल रीफ, पांढरी वाळू आणि अरबी समुद्राचे सुंदर निळे पाणी पाहायला मिळते.  
 
आगत्ती बेट-
आगत्ती बेट चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले असून या ठिकाणी आल्यावर  मनाला अगदीच भुरळ पडते. या ठिकाणचे सौंदर्य, आजूबाजूला पसरलेले निळे पाणी, सूर्यकिरण, पांढरी वाळू आणि रंगीबेरंगी मासे पर्यटकांना आकर्षित करतात. हे विशिष्ट बेट स्नॉर्कलिंग क्रियाकलापांसाठी ओळखले जाते.
 
बंगाराम बेट-
बंगाराम बेट हे हिंदी महासागराच्या निळ्या पाण्यात असलेले एक  आकर्षक स्थळ आहे. रंगीबेरंगी मासे आणि डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. सूर्यास्त आणि सूर्योदयमुळे या बेटाच्या सौंदर्यात भर पडते. 
 
कावरत्ती बेट-
लक्षद्वीपच्या सुंदर बेटांमध्ये कावरत्ती बेटाचा समावेश होतो. ही लक्षद्वीपची राजधानी असून जी पांढरी वाळू आणि सुंदर दृश्यांनी नटलेली आहे. नारळाची झाडे आणि सुंदर असे समुद्राचे पाणी पर्यटकांना या बेटाकडे आकर्षित करते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती