* जंगलात भटकताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपला पेहराव. हा कायम निसर्गातील रंगांशी सुसंगत असणे गरजेचे आहे. पक्षी पाहायला जाताना तर हे बंधन नक्कीच पाळावे, अन्यथा वन्यजीव आणि पक्ष्यांचे दर्शन दुमीळ होऊ शकते.
* आपला आवाज, गोंगाट, मोबाइलवरील संगीत, मोबाइलवरील पक्ष्यांचे आवाज हे सर्व त्या वातावरणाशी सुसंगत नसते. ती कृत्रिमता टाळणे योग्य ठरू शकेल.
* हल्ली पक्षी पर्यटनामध्ये एक अतिशय घातक ट्रेण्ड दिसून येत आहे, तो म्हणजे या पक्ष्यांना फरसाण व इतर खाद्यपदार्थ देणे. पक्ष्यांचे नैसर्गिक खाद्य या सदरात या बाबी मोडत नाहीत. त्यामुळे अशा पदार्थाची सवय त्यांना लावणे योग्य नाही आणि ते त्यांच्या पचनसंस्थेसाठी घातक आहे. हे प्रकार तर पूर्णपणे टाळायलाच हवेत. असेच प्रकार माकड व अन्य काही प्राण्यांबाबत होतात. ते देखील टाळावेत.