नागोरी पुरी

ND
साहित्य : 250 ग्रॅम मैदा, 50 ग्रॅम रवा, मीठ, ओवा चवीनुसार, तळण्यासाठी तूप.

कृती : सर्वप्रथम मैदा-रवा चाळून त्यात मीठ ओवा घालून पाण्याने घट्ट भिजवावा. नगोरी पुरीचा आकार पाणीच्या बत्ताशाच्या थोडा मोठा असतो म्हणून ह्या अंदाजाने गोळे बनवावे आणि लाटावे. कढईत तूप गरम करून पुरी अशी तळावी की फुटायला नको. नागोरी पुरी शिऱ्या सोबत खाण्यात स्वादिष्ट लागते. ह्या पुरिला भाजीसोबत सुद्धा खाता येते.

वेबदुनिया वर वाचा