साहित्य : दोन काकड्या, दोन ढोबळी मिरच्या, पालकाची दोन पानं, एक हिरवी मिरची, दोन लसूण पाकळ्या, तीन कप पाणी, नारळाचं दूध दोन कप, अर्धा कप ताक किंवा लिंबाचा रस दोन चमचे, मीठ, साखर, मिरपूड अर्धा चमचा, जिरं पूड, एक तमालपत्र.
कृती : काकड्यांची सालं काढून चकत्या करून त्या दोन कप पाण्यात तमालपत्र घालून उकळत ठेवाव्या. त्यातच पालकाची पानं, चिरलेल्या ढोबळी मिरच्या घालून उकळी आणावी. उतरवून त्यातल्या भाज्या गाळून घ्याव्यात व मिक्सरमध्ये मिरची-लसूण वाटून प्युरी करावी. त्यात गाळलेलं पाणी घालून पुन्हा एकदा गाळून घ्यावं. त्यात लिंबाचा रस, मीठ, साखर, मिरपूड, जिरं पूड, नारळाचं दूध घालून फ्रीजमध्ये थंड करून हे सूप प्यायला द्यावं.