पॉर्न बनवताना महिलांच्या भावनांचा विचार केला जात नाही म्हणून मी हे चित्रपट बनवते: एरिका लस्ट

मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019 (12:39 IST)
"महिलांच्याही लैंगिक गरजा असतात. आम्हीसुद्धा सेक्समुळेच जन्मलो. स्त्रियांना तुम्ही का विसरता ?'' असा प्रश्न एरोटिक फिल्म डायरेक्टर एरिका लस्ट विचारतात.
 
त्या म्हणतात, "महिलांनाही पॉर्न पाहायला आवडतं. पुरुषांसारखाच पॉर्नचा आनंद लुटावा, अशी त्यांचीही इच्छा असते. पण बहुतेक वेळा पुरुषांना आवडणारं पॉर्नच तयार केलं जातं."
 
"आपण नेहमीच पुरूष केंद्रस्थानी असलेलं पॉर्न पाहतो. पण मी माझ्या चित्रपटात नेमकं उलट करते. सारखं का माचो पॉर्न पाहायचं? त्याने मूड जाऊ शकतो.'' एरिका सांगतात.
 
जगातल्या सर्वांत मोठ्या (पॉर्न हब 2018 सालच्या परीक्षण डेटानुसार) पॉर्न साइटवर प्रति सेकंदाला 1,000 पेक्षा जास्त वेळा सर्च केलं जातं.
 
"सर्च केल्यावर आपल्याला काय पाहायला मिळतं, तर तेच नेहमीचं 'माचो पॉर्न.' या चित्रपटांमधल्या पुरुषांना स्त्रियांच्या भावनांशी काहीही देणंघेणं नसतं, काही वेळा तर त्यांना समोर कोण स्त्री आहे याच्याशीही काही देणं-घेणं नसतं," असं लस्ट म्हणतात.
 
एरिका लस्ट सांगतात, "की कोणत्याही पॉर्न साइटवर सर्च करून पाहा बरं.. काय दिसतं? महिलांबद्दल अश्लील शेरेबाजी असते इथं. हे काय आहे हे? यात काही सौंदर्य नाही. शृंगार नाही."
 
त्या पुढे म्हणतात की, "हे पॉर्न स्त्रियांच्या लैंगिक इच्छांचा अजिबात विचार करत नाही. मी माझ्या चित्रपटांमध्ये स्त्री-पुरुष दोघंहीजण आपापला आनंद शोधताना दाखवते. सेक्स म्हणजे परस्पर देवाण-घेवाण असली पाहिजे, स्त्री-पुरुषांनी एकमेकांबरोबर वेळ घालवला पाहिजे.'' असंही एरिका आवर्जून सांगतात.
 
'मोर ऑरगॅझम प्लीज अॅग्रीज' या पुस्तकाच्या सहलेखिका आणि हॉट बेड पॉडकास्टच्या आयोजिका लिसा विल्यम्स सांगतात की, "प्रत्यक्षात आम्ही जो सेक्सचा आनंद घेतो तो ऑनलाइन पॉर्नमध्ये सापडत नाही असं आमचे वाचक आणि श्रोते सांगतात. यामध्ये कुठेही स्त्रीच्या लैंगिक इच्छांचा विचार झालेला नसतो, स्त्रीच्या इच्छा नक्की काय असतात याचाही कुणीच विचारही केलेला नसतो.''
प्रामुख्यानं दाखवण्यात येणारं पॉर्न त्याच त्या जुन्या संकल्पनांवर आधारलेलं आहे. इन्स्टाग्रामवर तर त्याला बंदीच आहे.
 
तरीही एरिका त्यांच्या पॉर्न चित्रपटांना प्रमोट करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. कधी कधी या चित्रपटातले कलाकार तयार नसतात, पण त्यांची परवानगी असल्यास एरिका हे माध्यम जरूर वापरतात.
 
ऑनलाइन व्यासपीठानं चित्रपटासाठीचे फोटो आणि इतर निर्मिती शेअर करण्यासाठी परवानगी नाकारणं हे पक्षपाती असल्याचं एरिका मानतात.
 
सोशल मीडियावरचं स्वतःचं खातं आणि इन्स्टाग्रामवर सेक्सशी संबंधित गोष्टींवर `शॅडो बॅन' म्हणजेच पूर्णपणे किंवा काही अंशी बंदी घालण्यात आलेली आहे, असं एरिका यांना ठामपणे वाटतं.
 
याविरोधात एरिका यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर अन्य काही कलाकारही पुढे आले.
इन्स्टाग्रामनं का घातली बंदी?
याप्रकरणी इन्स्टाग्रामनं बीबीसीला सांगितलं की, ते "शॅडो बॅन'' करत नाहीत. पण कुणी कंटेटबद्दल तक्रार केली तर त्यांना योग्य ती कृती करावी लागते. कुणी नियम मोडले तर वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मच्या निर्णयाविरोधात आवाहन करण्याची संधी मिळते.
 
यावर लिसा म्हणतात, की @thehotbedcollective हे लैंगिक शिक्षण देणारं खातं आहे - या खात्यालाही शॅडो बॅनचा सामना करावा लागला आहे.
 
"आम्ही काही पोस्ट केल्या होत्या आणि त्या रिपोर्ट केल्या गेल्या. त्यामुळे त्या काढून टाकण्यात आल्या. खरं तर आम्ही काहीही आक्षेपार्ह पोस्ट केलेलं नव्हतं. स्त्री हस्तमैथुन करत असल्याचं कलात्मक प्रतिनिधिक चित्र आम्ही टाकलं होतं. ते अगदी ताबडतोब हटवण्यात आलं. हा दुटप्पीपणा आहे. या कृतीमुळे महिला सक्षमीकरण आणि तिच्या शरीराबदद्लची माहिती या पोस्टचा सगळा जीवच निघून गेला,'' असं लिसा सांगतात.
 
लैंगिक शिक्षणाचं काय?
एरिका तर म्हणतात, इंटरनेटवर महिलांबद्दल स्त्रियांबद्दल वाईट बोलणाऱ्या अकाउंटवर कारवाई होत नाही पण महिलांना लैंगिक शिक्षण देणाऱ्या गोष्टींना बंदी घातली जाते.
 
एक तृतीयांश स्त्रियांनी असं सांगितलं की पॉर्नमधूनच त्यांना लैंगिक शिक्षण मिळालं. (बीबीसी सर्वेक्षण 2019, यूकेच्या माहितीनुसार), तर 53 टक्के मुलांचा ऑनलाइन पॉर्न चित्रपट म्हणजेच वास्तव आहे असा विश्वास आहे. (एनएसपीसीसी सर्वेक्षण 2017, यूकेच्या माहितीनुसार).
 
आपल्या समाजात सेक्सबद्दल अजिबात शिक्षण दिलं जात नाही, मग तरुण-तरुणी आपोआप पॉर्नकडे वळतात. लोकांना सेक्सबद्दल जाणून घ्यायचं असतं, सेक्स काय असतो ते पाहायचं असतं, म्हणूनच ते पॉर्नकडे वळतात,'' असं एरिका सांगतात.
 
"पण एथिकल पॉर्न किंवा ज्यामध्ये शोषण होत नसेल असं पॉर्न ऑनलाइन शोधणं सोपं नाहीये. तसं पॉर्न पाहण्यासाठी काही वेळा तुम्हाला पैसेही मोजावे लागतात,'' असं लिसा सांगतात.
 
"मी 13-14 वर्षांची झाले तेव्हापासून लैंगिकतेकडे लक्ष द्यायला लागले. माझ्याकडे इंटरनेट नावाची जादूई गोष्ट होती तेव्हा.'' असं एरोटिक चित्रपटातली नायिका हैदी सांगते. हैदी यांनी एरिका यांच्या काही चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.
 
"पॉर्नचा आपल्यावर किती परिणाम होतं ते सांगणारी माझी बहुतेक पहिली पिढी असेल. फक्त तरुण पिढीवरच नाही तर पॉर्नचा सगळ्यांवरच परिणाम होत असतो,'' असं हैदी म्हणाल्या.
 
माझ्या लैंगिक जीवनाच्या सुरुवातीच्या काळात मी पॉर्नचे परिणाम अनुभवले आहेत. माझा एक पार्टनर एकदा माझ्या तोंडावर थुंकला आणि म्हणाला, "ये... यू लाइक दॅट, यू डर्टी स्लट..''
 
पॉर्नमध्ये स्त्रियांचं प्रदर्शन केलं जातं.
 
'महिलांच्या भावनांचा विचार केला जात नाही'
"स्त्रियांनासुद्धा लैंगिक इच्छा असतात. त्यांनाही पॉर्न पाहायला आवडतं. पण सध्या जे पॉर्न दाखवलं जातं ते पाहाणं कधी कधी असह्य होतं आणि त्याचा विचार करण्याची कुणी साधी तसदीही घेत नाही.'' लिसा सांगतात.
 
"आपलं शरीर कसं आहे त्याच्या संवेदना समजून, पॅशन काय असते, प्रेम-आकर्षण काय असतं ते पाहायचं आहे. आम्हाला नव्या संकल्पना हव्या आहेत आणि आमची इच्छा पूर्ण करेल असं पॉर्न हवं आहे,'' असंही लिसा म्हणतात.
 
हैदी म्हणतात, "मी एरिकाबरोबर दोन वर्षं काम केलं आहे. माझ्यासारख्या मुलीला, पूर्ण शरीराचा वापर करून सादर करणारा दुसरा कुणीही दिग्दर्शक नाही.''
 
"मी 21 वर्षांची झाले होते तेव्हा मला याची गरज भासली होती.'' त्या सांगतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती