मुंबईत कोरियन महिलेचा विनयभंग झाल्याची घटना व्हीडिओमुळे सोशल मीडियावर वेगाने प्रसारित झाली. या व्हीडिओला पोलिसांपर्यंत पोहोचवून पोलिसांनी सू-मोटो कारवाई करेपर्यंत मदत करणाऱ्या अथर्व आणि आदित्य या दोघांचे आभार त्या महिलेने मानले आहेत. या महिलेने त्या दोघांसोबत जेवणही केल्याचा व्हीडिओ तिने प्रसिद्ध केला आहे.
ती मुलगी व्हीडिओचं चित्रिकरण करताना हजाराहून अधिक लोक तेथे होते, मात्र त्या त्रास देणाऱ्या तरुणांना तिच्यापासून दूर करण्यासाठी कोणीही मदत केली नाही अशी माहिती सोशल मीडियात व्यक्त होत आहे. ट्वीटरसारख्या समाजमाध्यमात काही लोक संतापही व्यक्त करत आहेत.