गंगेत वाहणारे मृतहेद भारताचे नाहीत - कंगना राणावत

शनिवार, 15 मे 2021 (20:21 IST)
सध्या गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांचे व्हायरल होणारे व्हीडिओ हे भारतातले नसून नायजेरियाचे असल्याचं अभिनेत्री कंगना राणावतने म्हटलंय.
जग एकीकडे कोरोनाशी झुंजत असतानाच काही देशांमध्ये युद्ध सुरू असताना तिथले सगळे लोक त्यांच्या देशाच्या बाजूने आहेत, पण मृतदेहांचे हे व्हीडिओ व्हायरल करणारे लोक त्यांच्याच देशाच्या पाठीत सुरा खुपसत असल्याचंही कंगनाने म्हटलंय.
 
अक्षय्य तृतीया आणि ईदच्या निमित्ताने शुभेच्छा देणारा व्हीडिओ कंगना राणावतने फेसबुकवर पोस्ट केलाय. ट्विटरने काही दिवसांपूर्वी कंगनावर कारवाई करत तिचं ट्विटर हँडल बंद केलं होतं.
 
पण फेसबुकवरच्या या व्हीडिओनंतर कंगना राणावतला पुन्हा ट्रोल करण्यात येत असल्याचं म्हटलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती