पोलिसांच्या माहितीनुसार एकूण 9 स्फोट झाले. आणि याप्रकरणी आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी स्फोटाशी संबंध असल्याच्या संशयावरून 9 जणांची छायाचित्रं जारी केली आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी छापेमारीही सुरू आहे. विशेष म्हणजे त्या 9 जणांपैकी 8 जण हे श्रीलंकन नागरीक आहेत. इस्लामिक स्टेट अर्थात आयएसचा हात या स्फोटात होता का? याच चौकशी श्रीलंकन सरकारने सुरू केली आहे.
संरक्षण सचिवांचा राजीनामा
9 पैकी एका हल्लेखोरानं श्रीलंकेत परतण्यापूर्वी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे पोलिसांनी स्फोटाशी संबंध असल्याच्या संशयावरून 70 जणांना ताब्यात घेतलं आहे.
गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्याचा इशारा देऊनही त्याची माहिती कॅबिनेट किंवा पंतप्रधानांना न देणं आणि हल्ले रोखण्यात अपयश आल्याच्या कारणावरून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी हेमसिरी फर्नांडो यांचा राजीनामा मागितला होता. जो गुरूवारी त्यांनी राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. दरम्यान श्रीलंकेतील कॅथलिक चर्चने सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन निलंबित केलं आहे.