सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा : बच्चू कडू

सोमवार, 2 डिसेंबर 2019 (13:47 IST)
सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा करा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
  
त्यांनी म्हटलं, "मधल्या काळात सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद झाल्या. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. सिंचनाची अवस्था विदर्भ-मराठवाड्यात खराबच आहे. मराठवाडा विदर्भात सिंचनाचा अनुशेष कमी झालेला नाही. माझ्या मतदारसंघात आणि अमरावती जिल्ह्यात किमान 8 ते 9 प्रकल्पाची सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) भेटलेली नाही."
 
"पुढचे 6 महिने मंत्री, आमदार आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका. ती मदत शेतकऱ्यांना द्या," अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे.
 
"सभागृहात बोलताना बच्चू कडू यांनी अपक्ष आमदारांना बोलण्यासाठी कमी वेळ मिळतो. प्रमुख पक्षांच्या सदस्यांना जास्त वेळ दिला जातो आणि आम्ही प्रश्न मांडायला लागतो, तेव्हा वेळ कमी का होतो?" असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचं बातमीत म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती