BSNL-MTNLचं विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

गुरूवार, 24 ऑक्टोबर 2019 (08:02 IST)
23 ऑक्टोबरला झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या दोन्ही कंपन्या सरकार बंद करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं बातमीत म्हटलं आहे.
 
दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

"भूतकाळात BSNLवर मोठा अन्याय झाला. त्यामुळे BSNL आणि MTNLच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाबरोबरच कामगारांच्या व्हीआरएसची योजनाही आखण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना व्हिआरएसचं आकर्षक पॅकेज देण्यात येणार आहे. व्हीआरएस योजनेनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचं वय 53 वर्षं असेल, तर त्याला वयाच्या साठीपर्यंत 125 टक्के पगार मिळेल," असं त्यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती