नेहरूंनी एका बाईच्या नादाला लागून देशाची फाळणी मान्य केली - रणजित सावरकर

शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (19:18 IST)
Twitter
विनायक दामोदर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी आज राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. 
 
‘your obedient servant ही बोलण्याची पद्धत होती. याचा शब्दश: अर्थ कसा घेतला जातो’, असा प्रश्न विचारत रणजित सावरकर यांनी राहुल गांधी अत्यंत मूर्ख आहेत असं म्हटलं.
 
हे आपण अत्यंत जबाबदारीने म्हणत आहोत असंही त्यांनी सांगितलं.
 
नेहरूंनी एका बाईच्या नादाला लागून देशाची फाळणी मान्य केली, असं विधानही त्यांनी केलं आहे.
 
 
 
मी काँग्रेसच्या विरोधात नाही. पण ही जी प्रवृत्ती आहे त्याला विरोध आहे, असं सावरकर यांनी सांगितलं.
 
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “परवा राहुल गांधी आरोप केले की विनायक दामोदर सावरकर पेन्शन घेत होते. नंतर म्हणाले की गांधींना विरोध केला. मग माफीनामा दाखवला.
 
Most obedient servant असं त्यावेळी बोलण्याची पद्धत होती. माझ्याकडे गांधींचंही पत्र आहे ज्यात ते हेच म्हणतात.  
 
कुठल्याही कैद्याला कोठडीबंद ठेवत नाही. अंदमानमध्ये नियम होता की कुठल्याही कैद्याला सहा महिने बॅरेकमध्ये ठेवलं जातं. पण त्यांना बॅरेकमधून बाहेर काढलं नाही म्हणून पत्र लिहिलं होतं. जेलमधून बाहेर काढण्यासाठी ते पत्र नव्हतं. इतर कैद्यांना जो नियम लागू होतो तोच आम्हाला लावा असं त्यांचं म्हणणं होतं. तो अर्ज त्याच्यासाठी होता.
 
जगात सगळीकडे क्रांतीकारांना माणुसकीची वागणूक मिळते, पण आम्हाला ती मिळत नाही असं पत्रात लिहिलं आहे.  
 
जर हा दयेचा अर्ज असता तर अशी भाषा वापरली असती का? जर सरकारला वाटत असेल की माझ्या मुक्ततेसाठी हे पत्र लिहित आहे तर इतरांना बाहेर काढा मला तेवढंच समाधान मिळेल. हे सुद्धा पत्रात लिहिलं आहे. सवलत मागताना कोणत्याही याचिकेला दया याचिका म्हणतात.” 
 
ते पुढे म्हणाले, “सावरकरांसोबत जे तुरुंगात राहिले होते. कैदी 1912 - त्यांच्या बाजूचा क्रांतीकारक म्हणाला की माझ्या बाजूने विनायक सावरकर लढू शकेल. जर सावरकर 50 वर्षं काढू शकतात तर मी सुद्धा काढू शकतो. सावरकरांचं म्हणणं होतं की क्रांतीकारांनी कुठेही खितपत पडू नये. त्यांनी बाहेर पडावं आणि बाहेर पडल्यावर आपलं स्वातंत्र्यासाठी कार्य सुरू ठेवावं.
 
काही काळ मी आणि माझा भाऊ राजकारणापासून दूर राहू ही अट इतर सर्व कैद्यांनी क्रांतीकारांनी मान्य केली होती. अत्यंत कठोर परिस्थितीमध्ये मला आणि माझ्या भावाला ठेवलं असाही उल्लेख त्या पत्रात आहे.
 
माफी मागणारा अशी भाषा वापरत नाही. अंदमानचे तुरुंग अनेकांनी पाहिलं आहे. पण तुम्ही रत्नागिरीचं पाहा. ते तुरुंग 8 बाय 6 एवढेच होतं. त्यावेळी त्यांनी हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं. ह्याचं दु:ख हे आहे” 
 
रणजित सावरकर म्हणाले, “1921 ला आंदोलन सुरू झालं असहकार आंदोलन सुरू झालं. जालियनवाला बाग नंतर असहकार आंदोलन सुरू झालं. त्यानंतर गांधीजींनी एक पत्र लिहिलं त्यात ते केवळ अहमदाबाद इथल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे.
 
यात गांधीजी म्हणतात की, ‘तुमच्या लोकांचं डोकं फिरलं आणि त्यांना गोळ्या घातल्या. जालियनवाला बाग हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना मी शहीद म्हणणार नाही.’ गांधीजींनी थोड्याआधी करार केला असता तर भगतसिंहांचे प्राण वाचले असते.” 
 
“काँग्रेसचे नेते त्यावेळी राजेशाही थाटात राहत होते. गांधी येरवडा जेलमध्ये होते. त्यावेळी त्यांच्या 75 व्या वाढदिवसादिवशी त्यांना जेलरने 75 चांदीची नाणी दिली आणि बकरीच्या दुधाचं आईस्क्रिम बनवलं होतं.
 
ब्रिटिशांनी ठरवून टाकलं होतं की भारताची फाळणी करायची. किती करायची आणि कशी करायची हे ठरलं नव्हतं. संस्थानं वेगळी करायची हे ठरलं होतं. हे सावरकरांना माहिती होतं म्हणून त्यांनी अखंड हिंदुस्थान आठी भूमिका घेतली. त्यावेळी काही मुस्लीम नेतेही त्यांच्यासोबत होते.”
 
नेहरूंनी एका बाईच्या नादाला लागून देशाची फाळणी मान्य केली, असं विधानही त्यांनी केलं आहे.
 
 “1946 साली नेहरूंनी शपथ घेतली ब्रिटिश साम्राज्यासाठी. मग त्यांचे वंशज कोणत्या तोंडाने आता बोलतात. व्हॉईसराॅयने जेवायला बोलवलं की जायचं नाही असं काँग्रेसचं ठरलं होतं. पण मी मंत्री म्हणून तुम्हाला बोलावतोय असं म्हणून त्याना बोलवलं आणि फूट पाडण्यास सुरुवात केली.
 
मग 72 दिवसांत भारताच्या फाळणीचा कट रचला. नेहरूंकडून व्यक्तिगत अप्रूव्ह करून घेतला. भारताच्या फाळणीची मागणी नेहरूंनी परस्पर कोणालाही न विचारता मंजूर केली. 11 महिने आधी केली ही हुशारी सुद्धा त्यांनी केली. व्यवस्था बसली नव्हती, कायदा, नव्हता 20 लाख लोक त्यानंतर म्हणून दंगलीत गेले.
 
नेहरूंच्या प्रेम प्रकरणाचं उत्तर आधी राहुल गांधी यांनी द्यावं. माऊंटबॅटनची मुलगी पत्रात म्हणते माझ्या आईला रोज रात्री पत्र लिहायचे. नेहरूंनी एका बाईच्या नादाला लागून देशाची फाळणी मान्य केली. 12 वर्षं पंतप्रधान कार्यालयाची गोपनीय माहिती ब्रिटिश अधिका-याच्या पत्नीला दिली जात होती. "
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती