आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव- पटोले

गुरूवार, 4 मार्च 2021 (16:10 IST)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टी आणि रा. स्व. संघावर पुन्हा एकदा तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे.
 
सर्वांत जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या विकून त्या भांडवलदारांच्या घशात घातल्या आहेत. त्यानंतर आरक्षण संपणार आहे. हा आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव असल्याचा पटोले', यांनी आरोप केला आहे.
 
धनगर समाजाला भाजपानं 5 वर्षांत आरक्षण दिलं नाही, या समाजाची फसवणूक केली असंही ते म्हणाले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती