उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर : पाहा कुणाला कोणतं मंत्रालय?
सोमवार, 6 जानेवारी 2020 (10:42 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे.
गृहमंत्रिपदाची धुरा अनिल देशमुख यांच्या खांद्यावर, तर अर्थमंत्रालयाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आलीय.
बाळासाहेब थोरात यांना महसूल खातं देण्यात आलं आहे. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम, जयंत पाटील यांना जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे मंत्रिपद मिळालं आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीनं राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरही खातेवाटप झालं नव्हतं.
28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर 30 डिसेंबर रोजी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर 43 कॅबिनेट आणि राज्यमंत्री असं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे.
शिवसेना
कॅबिनेट मंत्री
1. उद्धव ठाकरे- मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, विधी-न्याय
2. सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
3. एकनाथ शिंदे - नगर विकास, सार्व. बांधकाम (सार्व. उपक्रम)
2. शंभुराज शिवाजीराव देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
3. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
राष्ट्रवादी
कॅबिनेट
1. अजित पवार (उपमुख्यमंत्री) - वित्त, नियोजन
2. अनिल देशमुख - गृह
3. छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा
4. दिलीप वळसे पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क
5. जयंत पाटील- जलसंपदा
6. नवाब मलिक - अल्पसंख्याक कल्याण
7. राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
8. राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य
9. हसन मुश्रीफ - ग्रामविकास
10. जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
11. बाळासाहेब पाटील - सहकार, पणन
12. धनंजय मुंडे - सामाजिक न्याय
राज्यमंत्री
1. दत्तात्रय विठोबा भरणे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
2. संजय बाबुराव बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
3. प्राजक्त प्रसादराव तनपुरे - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
4. आदिती सुनिल तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
काँग्रेस
कॅबिनेट
1. बाळासाहेब थोरात - महसूल
2. अशोक चव्हाण - सार्व. बांधकाम (सार्व. उपक्रम वगळून)
3. नितीन राऊत - ऊर्जा
4. वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण
5. सुनील केदार - पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण
6. विजय वडेट्टीवार - ओबीसी कल्याण
7. अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
8. के.सी. पाडवी - आदिवासी विकास
9. अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
10. यशोमती ठाकूर - महिला व बालविकास
राज्यमंत्री
1. सतेज उर्फ बंटी डी. पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
2. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा