मोदी सरकारविरोधात 8 जानेवारीला कामगार संघटनांचा देशव्यापी संप

मंगळवार, 7 जानेवारी 2020 (09:47 IST)
मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी 8 जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आलाय. यात दहा राष्ट्रीय कामगार संघटनांचा सहभाग आहे. जवळपास 25 कोटी लोक संपात सहभागी होती, असा दावा संघटनांकडून करण्यात आलाय.  
 
"8 जानेवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात 25 कोटींहून अधिक लोकांच्या सहभागाची आम्हाला अपेक्षा आहे. कामगारविरोधी, लोकविरोधी, देशविरोधी धोरणांचा निषेध यातून केला जाईल," असं कामगार संघटनांच्या पत्रकातून सांगण्यात आलंय.
 
कामगार मंत्र्यांसोबतच्या 2 जानेवारी 2020 रोजीच्या बैठकीतून काहीच निष्पन्न न झाल्यानं कामगार आणि विद्यापीठांमधील फीवाढ आणि शिक्षणाचं बाजारीकराविरोधात विद्यार्थी यात सहभाग होतील, असाही दावा करण्यात आलाय.
 
दुसरीकडे, महाराष्ट्रातले सरकारी कर्मचारी 8 जानेवारीला पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र टाइम्सनं दिलीय. या संपाला राजपत्रित महासंघानं पाठिंबा दिल्याचंही बातमीत म्हटलंय.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती