अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी बायडन यांनी अफगाण नेत्यांवर फोडलं खापर
अफगाणिस्तानच्या अवस्थेसाठी देश सोडून जाणारे नेतेच जबाबदार आहेत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे.
देशांनी आपल्या सीमा अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी खुल्या कराव्यात-मलाला
"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानसाठी भरीव योगदान द्यायला हवं, त्यांना अजून खूप काही करायचं आहे. त्यांनी धाडसी पाऊल उचलायलं हवं", असं शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने म्हटलं आहे. बीबीसीच्या टूज न्यूजनाईट या कार्यक्रमात ती बोलत होती.
"अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या रक्षणासाठी जागतिक नेत्यांनी विशेषत:अमेरिका आणि युकेच्या नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. अन्य देशांनी अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी सीमा खुल्या कराव्यात", असं मलालाने म्हटलं आहे.
"तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं यासंदर्भात अमेरिका बेजबाबदार विधानं करत आहेत. अमेरिकेने ज्या पद्धतीने याला युद्ध संबोधलं आणि या युद्धात विजयी झालो असं जाहीर केलं त्यामुळे चुकीची प्रतिमा तयार झाली", असं मलालाने सांगितलं.