मुंबई महापालिकेतल्या कंत्राटदार कंपन्यांवर छापे

शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (11:26 IST)
मुंबई महापालिकेच्या कंत्राटदार कंपन्यांनावर प्राप्तिकर विभागानं छापे मारले आहेत. या कंत्राटदार कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर चुकवला असून, आर्थिक गैरव्यवहार केल्याचं तपासातून समोर आलंय.
 
6 नोव्हेंबरला प्राप्तिकर विभागानं मुंबई आणि सुरतमधील 37 ठिकाणी छापे मारून चौकशीला सुरूवात केली. ही ठिकाणं मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांशी संबंधित आहेत.
 
मुंबई महापालिकेतल्या कंत्राटदार आणि त्यांच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर बुडवल्याचं, तसंच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे हाती लागल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या आयुक्त आणि प्रवक्त्या सुरभी अहलुवालिया यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती