प्रतिगामी विचार करणाऱ्या नवीन भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही असं नयनतारा सहगल म्हणाल्या.
प्रतिगामी विचार करणाऱ्या नवीन भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही. धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्र अशी ओळख देण्याची धडपड सुरू आहे.
हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं असं साहित्यिक नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे.
आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाऊंडेशन यांच्यातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त नयनतारा यांना लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
"मतं मांडण्याचा सामान्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे.सरकारविरोधात लिहिणाऱ्यांच्या हत्या होत आहेत. देशात पसरवली जाणारी विषमता हिंदू आणि इतर अशी नसून हिंदुत्व मानणारे आणि न मानणारे अशी आहे," त्या पुढे म्हणाल्या.
एकीकडे सगळ्यात मोठी लोकशाही असं म्हणायचं आणि दुसरीकडे स्वातंत्र्याची गळचेपी करायची हे विसंगत आहे, असंही त्या म्हणाल्या.