'पॅकेचची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी'

मंगळवार, 26 मे 2020 (15:20 IST)
"गुजरातमधील कोरोना परिस्थितीची तुलना बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशी करावी लागेल. सरकारी रुग्णालयाची अवस्था भीषण आहे, कोणत्याही सोयीसुविधा नाहीत, मनुष्यबळ नाही, असं न्यायालय म्हणत आहे. महाराष्ट्रातील सरकारने जी रुग्णालयं दोन महिन्यात उभी केली आहेत, त्या रुग्णालयात विरोधी पक्षांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्री गुजरातचा दौरा करून यावं, म्हणजे आपल्या तयारीची पूर्वकल्पना त्यांना येऊ शकेल. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळा आणत आहेत," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
 
गुजरात हे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे राज्य आहे. कोरोना उपायांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतलं आहे. कोरोना युद्धातील अपयश विरोधकांना वाटत असेल तर त्यांच्या शरीरात द्वेषाचा वायू पसरला असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे, असं या अग्रलेखात पुढे म्हटलं आहे.
 
दरम्यान गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात मजुर अधिक मात्र गुजरातला ट्रेन दुप्पट देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती