19 वर्षीय मुलीवर मुंबईत सामूहिक बलात्कार

शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (09:39 IST)
19 वर्षं वयाच्या एका मुलीवर मुंबईत तिच्या वाढदिवसादिवशीच सामूहिक बलात्कार होण्याची घटना घडली आहे. या मुलीला औरंगाबादच्या बेगमपुराधल्या रुग्णालयात दाखल केलं आहे. तिची प्रकृती स्थिर असली तरी नीट नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. ती सध्या बोलण्याच्या स्थितीमध्ये नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
 
बेगमपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "7 जुलै रोजी ही मुलगी मुंबईला गेली होती. तिच्या चार मित्रांनी तिचा वाढदिवस तिच्या घरात साजरा करण्याचं ठरवलं. केक कापल्यानंतर चौघांनीही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घरी परतल्यावर तिनं याबाबत पालकांना काहीही सांगितलं नाही. 24 जुलै रोजी गुप्तांगामध्ये वेदना जाणवू लागल्यानंतर तिला औरंगाबादमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय आल्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना याची माहिती दिली. 30 जुलै रोजी तिनं ही घटना आपल्या वडिलांना सांगितली. तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला."
 
चुनाभट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "याप्रकरणी तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती