लुटमार करणाऱ्या याच टोळीने ट्रेनमधल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. ट्रेन इगतपुरीहून कसाऱ्याला पोहोचेपर्यंत सुमारे अर्धा तास लूटमार - बलात्कार सुरू होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही तरुणी 20 वर्षांची आहे.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी सांगितलं, "आरोपी इगतपुरी रेल्वे स्टेशनवर टेृनमध्ये चढले. गाडी घाटात पोहोचल्यानंतर त्यांनी लूट सुरू केली. टेृनच्या D-2 बोगीमध्ये ही घटना घडली. गाडी कसारा रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर प्रवाशांनी मदत मागितली. आत्तापर्यत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतर आरोपींचा शोध सुरू आहे."