दसरा मेळावाः शिवाजी पार्क, बीकेसीमध्ये 'शिवसैनिक' जमायला सुरुवात
बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (15:57 IST)
आज शिवसेनेचे प्रथमच दोन दसरा मेळावे होत आहेत.
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी येथिल मैदानावर होत आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे.
आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी मागणी ठाकरेंच्या वतीने करण्यात आली होती.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, शिवसेना आमचीच आहे असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हे शिवसेना त्यांचीच आहे असा दावा करत आहे.
पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात अनेक गोष्टींवर भाष्य केले. जर पक्षाने मला तिकीट दिलं तर मी परळी मतदारसंघातून 2024 ला निवडणूक लढवणार आहे आणि त्याची तयारी आतापासूनच सुरू करणार आहे असं त्या म्हणाल्या.
3 हजार पोलिसांचा फौजफाटा बीकेसी मैदानाजवळ आणि रस्ते मार्गावर ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
शिवाजी पार्क मैदानावरील उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून आयोजित दसरा मेळाव्याला एकनिष्ठ दसरा मेळावा असं नाव देण्यात आलं आहे.
शिवाजी पार्क मैदानावरील उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून आयोजित दसरा मेळाव्याला एकनिष्ठ दसरा मेळावा असं नाव देण्यात आलं आहे.