वरळीत पोटनिवडणूक करा, मग कळेल मशाल आहे की चिलीम - आशिष शेलार

मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (10:28 IST)
“अंधेरी पूर्वच्या निकालानंतर मशाल भडकली, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. माझं त्यांना आवाहन आहे की, त्यांनी दिनांक सांगावी, वेळ सांगावी. वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची हिमंत दाखवावी. भाजपा कार्यकर्ते आमनेसामने लढून उद्धव ठाकरेंच्या सेनेची मशाल आहे की चिलीम हे दाखवून देतील,” असं आहान मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिलं. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
 
जागर मुंबईचा सभेत आशिष शेलार बोलत होते.
 
आशिष शेलार म्हणाले की, “मी 25 वर्ष जनतेच्या विश्वासावर निवडून आलेला राजकारणी आहे. या काळात तिकीट द्या म्हणणारे अनेक राजकारणी पाहिले. पण पक्षाने दिलेले तिकीट व्यापक हितासाठी मिळालेले तिकीट परत देणारे मुरजी पटेल हे आगळेवेगळे नेते आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे.”
 
पक्षाने सांगितल्यानंतर त्यागासाठी तयार राहण्याची वृत्ती भाजपाच्या नेत्यांमध्ये आहे, असंही शेलार म्हणाले. “जागर मुंबईचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काहीजणांच्या पोटात मुरडा सुरु झालाय. विरोधी पक्षाची टोळी मतिमंद झालीये. जागर मुंबईचे अभियान केवळ भाजपाला मत द्या, एवढ्यापुरते नाही. कुणा एकाला महापौर बनवायचे आहे, यासाठी देखील हे अभियान नाही. मुंबईकरांमध्ये जागृती आणण्यासाठी हा जागर आहे,” असं शेलारांनी सांगितलं.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती