'अमित शाह आणि राम मंदिराच्या पुजाऱ्यांना धर्माचे पालन न केल्यामुळे कोरोना': दिग्विजय सिंह

मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (12:36 IST)
सनातन धर्म आणि हिंदू परंपरेचं उल्लंघन केल्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राम मंदिराच्या पुजाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.
 
हिंदू धर्मातील मान्यतांना न मानल्याने असं झालं आहे. अशुभ मुहुर्तावर कोरोनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सनातन हिंदू धर्माच्या मान्यता डावलल्याचा हा परिणाम आहे असं दिग्विजय यांनी लिहिलं आहे.
 
भगवान राम हे कोट्यवधी हिंदू भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या धर्माच्या नियमांना तिलांजली देऊ नका असं दिग्विजय यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती