कोरोनालाही जगण्याचा अधिकार - भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत

शनिवार, 15 मे 2021 (22:40 IST)
कोरोनाही एक जीव आहे आणि त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं वक्तव्यं उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलंय.
"मनुष्य स्वतःला बुद्धीजीवी समजतो पण आपण त्या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत, त्यामुळेच तो स्वतःमध्ये बदल घडवत आहे," असं त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटलंय.
 
काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी यावर टीका करायला सुरुवात केली आहे. रावत यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हीडिओवरही अनेकांनी काँमेंट करत निषेध दर्शवलाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती