बालाकोटमधील हल्ल्याचे 'प्लॅनर' आता RAW प्रमुख

1984 च्या बॅचचे IPS अधिकारी सामंत गोयल यांना रिसर्च अँड अनालिसिस विंग चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. तसंच अरविंद कुमार यांची गुप्तचर विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
पंजाब केडरचे IPS अधिकारी सामंत गोयल यांनीच बालाकोट हल्ल्याचं 'प्लॅनिंग' केलं होतं, असं सांगितलं जात आहे. पंजाबमधील कट्टरवाद जेव्हा उफाळून आला होता तेव्हा त्यांनी हा प्रश्न हाताळण्यास मदत केली होती. त्यांनी दुबई आणि लंडनमध्येही काम केलं आहे.
 
सामंत गोयल सध्याचे प्रमुख अनिल कुमार धस्माना यांची जागा घेतील. अडीच वर्षांच्या बहारदार कारकीर्दीनंतर ते निवृत्त होत आहेत.
 
अरविंद कुमार हे काश्मीर प्रश्नांचे तज्ज्ञ आहेत. सध्या ते गुप्तचर विभागातच काश्मीरचे विशेष सचिव म्हणून काम पाहत आहेत. अरविंद कुमारसुद्धा 1984 च्या बॅचचेच AGMUT कॅडरचे IPS अधिकारी आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती