डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा Ambedkar Jayanti Wishes 2025 Marathi

सोमवार, 14 एप्रिल 2025 (07:28 IST)
नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
जय भीम
 
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
 
ज्याने सर्वांना समजले एक समान
असे होते आमचे बाबा महान
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 
जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: 32 Degrees of Dr. BR Ambedkar डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या ३२ पदव्या
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला घडवून गेले
अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
सागराचे पाणी कधी आटणार नाही
भिमाची आठवण कधी मिटणार नाही
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
ALSO READ: Ambedkar Jayanti Speech 2025 डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर मराठी भाषण
दगड झालो तर दिक्षाभुमीचा होईल
माती झालो तर चैत्यभूमीचा होईल
हवा झालो तर भीमाकोरेगावची होईल
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल
 
सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
जय भीम
 
हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता…
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता…
 
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला…

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती