अमेरिकेतही अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आकर्षण

मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (16:12 IST)
अयोध्येमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण अमेरिकेतही साजरा केला जाणार आहे. अयोध्येतील भूमिपूजनाच्या निमित्ताने अमेरिकेतील मंदिरांमध्ये उद्या खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
मंगळवारी यूएस कॅपिटोल हिल येथे खास जाहीराती प्रदर्शित करण्यासाठी बनवलेल्या ट्रकवर राम मंदिराचे डिजिटल फोटो दाखवले जाणार आहेत. भूमिपूजनाच्या निमित्ताने अमेरिकेतील मंदिरांमध्ये उद्या विशेष पूजा आणि प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण साजरा करण्यासाठी दिवे प्रज्वलित करणार असल्याचे तिथे स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी सांगितले.
 
रात्री कॅपिटोल हिल आणि व्हाइट हाऊसबाहेर फिरत्या ट्रकमधून LED डिस्प्लेद्वारे भव्य श्री राम मंदिराचे फोटो प्रदर्शित केले जातील असे वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय-अमेरिकन नागरिकांनी सांगितले. न्यू यॉर्कमध्येही राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा साजरा केला जाणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती