दैनिक राशीफल 02.06.2023

शुक्रवार, 2 जून 2023 (07:08 IST)
मेष :  आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.  
वृषभ : अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल. 
मिथुन :  महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी येणार्‍या अडचणी दूर होतील. आनंदाची बातमी मिळेल. 
कर्क : निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा. 
कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल. 
सिहं : प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल.  आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील.  
कन्या : आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता आहे. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
तूळ : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा.
वृश्चिक : आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील. आरोग्य उत्तम राहील. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल. 
धनू : अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा.  भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल. 
मकर : कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल.
कुंभ : वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील.  आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 
मीन : आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती