Akshaya Tritiya 2020 : अक्षय तृतीयेला हे दान करा, अक्षय लाभ मिळवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (09:33 IST)
अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करणे श्रेष्ठ मानले जाते. वैशाख महीन्यात सूर्य प्रकाशाची उष्णता आणि उन्हाळा सर्वत्र असल्याने ल्याही ल्याही होत असते. त्यासाठी या दिवशी थंड पाणी, कलश, तांदूळ, हरभरा, दूध, दही, कपड्यांचे दान करणे शुभ व अमीट पुण्य आहे.
असे मानले जाते की जे लोकं या दिवशी आपले चांगले भाग्य इतरांना वाटतात त्यांना देवाचे आशीर्वाद लाभतात. या दिलेल्या दानापासून अक्षय फळाची प्राप्ती होते. सुख, समृद्धी आणि सौभाग्य मिळावे म्हणून या दिवशी शिव-पार्वती आणि नर-नारायण यांची उपासना करण्याचा नियम आहे. ह्या दिवशी गौरीचे महत्व असल्याने या दिवशी गृहस्थांच्या जीवनात आनंद आणि शांती मिळविण्यासाठी केलेल्या प्रार्थना त्वरीत स्वीकार केल्या जातात. गृहस्थांचे कष्ट मुक्त जीवन ठेवण्यासाठी या दिवशी गौरीची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्या 14 वस्तूंचे दान देणे महत्वाचे आहेत.
1 गाय
2 जमीन
3 तीळ
4 सोनं
5 तूप
6 कापड
7 धान्य
8 गूळ
9 चांदी
10 मीठ
11 मध
12 मोठं
13 खरबूज
14 मुलगी (कन्यादान)
या दिवशी देणगीस्वरुप हे दान देण्याचे महत्व असल्याचे मानले गेले आहे.