भगवान विष्णूंच्या उपासनेत या वस्तू चुकुनही वापरु नये

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (16:03 IST)
भगवान विष्णूंच्या उपासनेत अगस्त्यचे फुलं, माधवी आणि लोध फुलांचा वापर करु नये. हे फुलं भगवान विष्णूंना आवडत नाही. यासह विष्णूजींच्या मूर्तीवर अक्षत म्हणजेच तांदूळ वाहत नाही. 
 
अधिक मासात भगवान विष्णूंची उपासना करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या. फुलं आणि पानांबद्दल लक्षात ठेवण्याच्या गोष्टी -
 
देवांची उपासना करताना अशुद्ध, शिळे आणि कीड लागलेले फुलं आणि पानं वापरू नये. 
खाली पडलेले, दुसऱ्याकडून मागितलेले, किंवा चोरून आणलेले फुलं पूजेसाठी वापरू नये. 
या व्यतिरिक्त कमळ आणि कुमुदीची फुले पाच दिवसापर्यंत शिळे होत नसतात. 
त्याच बरोबर बेलाची पाने शिळे होत नसतात. 
त्याच बरोबर बिल्वपत्र म्हणजे बेलाची पाने, तुळशीची फाटलेली पाने देखील अर्पण करू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती