अधिक मासात हे काम करा, समृद्ध व्हाल

सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (08:56 IST)
अधिक मास हा महिना भगवान विष्णू यांचा आवडीचा महिना आहे. या महिन्यात आपण काही खास उपाय करून आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर करू शकता. चला तर मग जाणून घ्या की अधिक महिन्यात कोण कोणते उपाय करावे. 

1 एखाद्या देऊळात नियमानं जावं.
 
2 कुटुंब, इष्टमित्रांसह एखाद्या तीर्थक्षेत्री जावं.
 
3 एखाद्या तीर्थक्षेत्राचे भ्रमण आपल्या जीवनात आनंद देतील.
 
4 या अधिकमासात शक्य असल्यास संपूर्ण महिना जमिनीवरच झोपावं.
 
5 शुभ फळाची प्राप्तीसाठी दररोज सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून गुरूंच्या चित्रांची पूजा करून दर्शन घ्या. 
 
6 भजन किंवा धार्मिक संगीत ऐकणे किंवा करणं आपल्यासाठी सौख्यकारी असणार.
 
7 आपल्या कुळदेव किंवा आराध्यदेवाचे दररोज 108 वेळा जप करावं. जेणे करून आपणांस सुख आणि शांती मिळते.
 
8 या महिन्यात एखादे धार्मिक शास्त्र वाचल्याने शुभ फळाची प्राप्ती होते. 
 
9 एखादे देऊळ किंवा तीर्थक्षेत्रात पवित्र कार्यात जसे की झाडून काढणं, लादी पुसणं सारखे सहकार्य केल्याने लाभ मिळेल.
 
10 तेलाचा आणि तुपाचा दिवा लावून किमान अर्धातास तरी ठराविक काळात शांतता बाळगण्यानं मानसिक शक्ती वाढते.
 
11 नियमानं एखाद्या संत किंवा महात्म्याची सेवा करणं किंवा त्याच्या चारित्र्याचे वाचन केल्यानं आपल्यासाठी समृद्धशाली असणार.
 
12 दररोज एखाद्या देवांचे 108 वेळा नामस्मरण किंवा मंत्राचे लेखन केल्याने शुभ फळाची प्राप्ती होते. 
 
पुरूषोत्तम महिन्यात वरील दिलेल्या विशेष उपायांव्यतिरिक्त माणसाने ध्यान -देणगी, व्रत कैवल्य, जप-तप, पूजा- उपासना आवर्जून करावं. असे केल्यानं आयुष्यातील सर्व त्रास आणि कष्टातून सुटका होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती