कहाणी अधिकमासाची

मंगळवार, 11 जुलै 2023 (17:02 IST)
Adhik Maas Katha Marathi ऐका कहाणी अधिकमासाची. आहे ही प्राचीन काळाची. आहे तिची घडण चंद्रसूर्याची. मानवंदना आहे देवदेवतांची. ही कहाणी कोणी कोणाला सांगितली ते चित्त देऊन ऐका.
 
एकदा सर्व ऋषी-मुनी तपोवनात एकत्र बसलेले होते. तेव्हा व्यास महर्षीचे आगमन झाले. ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोच. आपल्याला या वर्षात अधिकमासाचे आचरण करावयाचे आहे.
 
ऋषींनी : “हा कोणता अधिकमास ? ”
 
व्यास : अधिकमास म्हणजे जास्तीचा महिना. वर्षाचे एकूण महिने बारा. तेरावा म्हणजे अधिकमास.
 
ऋषी : तो कशासाठी?
 
व्यास : चंद्रसूर्याच्या गतीमुळे दर वर्षी दहा दिवसांचा फरक पडतो.तीन वर्षांनंतर असा एकूण एक महिनाचा फरक पडतो. एक महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसविला आहे. हाच अधिकमास. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात.
 
आता सांगतो, तेराव्या महिना ची कहाणी. नीट ठेवावी ध्यानी. त्याला मान द्दावा सर्वांनी. सांगितली मला नारदमुनीं नी ! सारेजण शांत झाले. मन लावून ऐकू लागले. व्यास महर्षीं बोलू लागले –
 
नारदमुनी भूतलावर फिरत होते. जगातील सुख दु:खाचा आढावा घेत होते. मृत्यु लोकातील माणसं नाना प्रकारची सुख - दु:ख भोगत आहेत; पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण फार कमी आहे. त्याचं काय बरं कारण असावं ?
 
नारदमुनी विचार करू लागले. विचार करीत करीत ते वैकुंठाला पोहोचले. भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते.
 
नारायण नारायण ... असा बराच जयघोष नारदांनी केला. नंतर नारदमुनी श्री विष्णूस म्हणाले, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात. पृथ्वीवरील लोकांचे लालान-पालनकर्ते आहात. मग तुम्ही कुणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता, हे मला सांगू शकाल का ?
 
विष्णू : नारदमुनी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्ही आता बघून आलात. लोक पापं करताहेत. त्यात पुण्याचं प्रमाण कमी आहे; पण त्यांनी केलेल्या पापंचं काय ? त्यांची तर भरपाई झाली पाहिजे.
 
नारद : ती भरपाई कशी होईल ?
 
विष्णू : होईल, ती भरपाई पण होऊ शकेल. ती भरपाई करणारा अधिकमास आता येणार आहे.
 
नारद : अधिकमास ?
 
विष्णू : होय. पापांची भरपाई करणारा अधिकमास. या मासाचं आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तम याची भक्ती करण्यानं सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवीन. चंद्रसूर्य यांच्या गतीत फरक पडतो. त्याचा मेळ हा महिना घालतो. दर तीन वर्षांनी तो येतो. महिन्यात सूर्य संक्रमण नसते, म्हणून या महिन्यास ‘मलमास’ ही म्हणतात. या महिन्यात लग्नादी मंगल कार्ये करीत नाहीत. अधिकमास दु:खी झाला. आपली गाऱ्हाणी तो सांगू लागला. सर्व जण माझा तिरस्कार करतात. हौस नाही, मौज-मजा नाही. मला वाईट वाटले. मी ज्योतीत रत्नजडित सिंहासन आहे. त्या सिंहासन यावर पुरुषोत्तम (मुरलीधर) बसले आहेत, त्या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूं नी माल मासाला घडविलं. दर्शनान चमत्कार केला. त्या अधिकमासाला दिव्यरूप आलं. लोखंड याच सोनं झालं.
 
नारदमुनी : म्हणजे, मलमास याचं महत्व वाढलं म्हणायचं.
 
व्यास : होय. त्या महिन्यात पुण्यकर्म वाढलं. दीपदान, व्रत, नियम, उपवास इत्यादी.
 
नारदमुनी : त्या महिन्यामुळं मग काय झालं ?
 
व्यास : लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले. त्यांची पापं नष्ट झाली. त्यांचं जीवन फुललं. त्यांच्या इच्छा फळाला आल्या. असा तो अधिकमास पुण्यमास ठरला.
 
- साभार सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती