अपरिग्रहाविषयी भगवान महावीर सांगतात, की, स्वतः सजीव किवा निर्जिव वस्तूंचा संग्रह करणारा, दूसर्याकडून संग्रह करून घेणारा किवा अशा प्रकारचा संग्रह करण्यास संमती देणार्याची दुःखापासून कधीच सुटका होत नाही.
खरा ज्ञानी कपडे, दागिने किवा शरीर असल्या कुठल्याच गोष्टीप्रती ममत्व ठेवत नाहीत. धन- धान्य, नोकर चाकर इत्यादींच्या परिग्रहाचा त्याग करायला पाहिजे. सर्व प्रकारच्या प्रवृत्तीस सोडून जीवन व्यतीत करणे कष्टप्रद असते. लाभ वाढण्यासोबतच लोभातही वृद्धी होत असते. जिमि प्रति लाभ लोभ अधिकाई.