जेव्हा मनुष्य आत्मिक उन्नती साधून परमात्मा बनतो तेव्हा तो तीर्थकर म्हणून समाजात ओळखला जातो. तीर्थ म्हणजे तट, घाट. जे धर्माचे प्रवर्तन करतात त्यांना तीर्थकर म्हणतात. जैन धर्मात आतापर्यंत 24 तीर्थकर झाले आहेत.
पहिले तीर्थकर ऋषभनाथजी तर चोवीसावे तीर्थकर भगवान महावीर होते. ऋषभनाथ यांना आदिनाथ, पुष्पदंत यांना सुविधिनाथ व महावीर यांना वर्धमान, वीर, अतिवीर आणि सन्मति या नावानेसुद्धा ओळखले जाते.
चोवीस तीर्थकरांची नावे-
भगवान ऋषभनाथ, भगवान संभवनाथ, भगवान सुपार्श्वनाथ, भगवान सुविधिनाथ, भगवान विमलनाथ, भगवान श्रेयांसनाथ, भगवान विमलनाथ, भगवान धर्मनाथ, भगवान कुंथुनाथ, भगवान मल्लिकानाथ, भगवान नमिनाथ, भगवान पार्श्वनाथ, भगवान अजितनाथ,
भगवान अभिनंदनस्वामी, भगवान पद्यप्रभस्वामी, भगवान चंद्रप्रभस्वामी, भगवान शीतलनाथ, भगवान वासुपूज्यस्वामी, भगवान अनंतनाथ, भगवान शांतीनाथ, भगवान अरनाथ, भगवान मुनिसुव्रतस्वामी, भगवान नेमिनाथ, भगवान महावीरस्वामी.