अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक महावीर

WD
सुमारे अडीच हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इ. स. पूर्व 599 मध्ये वैशालीच्या क्षत्रिय कुंडलपूरात पिता सिद्धार्थ आणि माता त्रिशाला यांनी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर महावीर वर्धमानाला जन्म दिला. लोक महावीरांना 'वीर', 'अतिवीर', आणि 'सन्मति' या नावानेही ओळखतात.

जैन धर्मीयांचे चोवीसावे तीर्थंकर महावीर स्वामी अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन त्याग आणि तपस्येत व्यतीत केले. ज्या युगात हिंसा, पशू ह‍त्या, जाती‍भेदाचे प्रमाण वाढले होते. त्याच युगात महावीरांचा जन्म झाला होता. महावीराने आपल्या प्रवचनातून जगाला सत्य आणि अहिंसेचे धडे दिले. संपूर्ण जगाला पंचशील तत्वाचा उपदेश दिला.

या पंचशील तत्वात सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेह आणि दया यांचा समावेश होतो. त्यांनी आपल्या काही खास उपदेशातून जगाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रत्येक प्रवचनात ते सत्य आणि अहिंसेचा प्रचार करत असत.

सत्
सत्याविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'हे मानवा! सत्य हेच खरे तत्व असून प्रत्येकाने सत्याच्या आज्ञेत राहीले पाहिजे.'

अहिंस
भूतलावर अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करू नये. त्यांच्याप्रती मनात प्रेम भावना ठेवून त्यांचे संरक्षण मानवाने करावे. अशा प्रकारचा अहिंसा संदेश भगवान महावीर आपल्या उपदेशात देत असत.

अपरिग्र
परिग्रहाविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'जो मनुष्य सजीव आणि निर्जीव वस्तूंचा संग्रह करतो. तसेच दुसर्‍यांकडून संग्रह करून घेतो किंवा दुसर्‍याला अशा प्रकारचा संग्रह करण्यास परवानगी देतो. त्या व्यक्तीची दु:खापासून कधीच सुटका होत नाही. हाच संदेश महावीरांनी अपरिग्रहाच्या माध्यमातून जगाला देण्याचा प्रयत्न केला.'

ब्रह्मचर्
ब्रह्मचार्य उत्तम तपस्या, नियम, ज्ञान, दर्शन, चरित्र, संयम आणि नम्रतेचे प्रतीक आहे. तपस्यात ब्रम्हचर्य सर्वश्रेष्ठ असल्याचा अमूल्य संदेश महावीरांनी दिला. जो पुरूष स्त्रीशी संबंध ठेवत नाही त्याला मोक्षप्राप्ती मिळते असे ते आपल्या संदेशात म्हणत असत.

क्षम
क्षमा या पंचशील तत्वाविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'मी सर्व प्राणीमात्रांना क्षमा करू इच्छितो. जगातील सर्व प्राणीमात्रांबरोबर मैत्री केली पाहिजे. कुणाशीही वैर नसावे. मी अंतकरणाने धर्मात स्थिर झालो आहे. सर्व प्राणीमात्रांना मी सर्व अपराधांची क्षमा मागतो. माझ्याविरूद्ध ज्याने अपराध केला असेल त्यालाही मी माफ करू इच्छितो. माझ्या मनात आलेल्या वाईट विचारांबद्दल किंवा माझ्याकडून झालेले सर्व पापांचा नाश होऊ दे.

धर्
धर्म सर्वात चांगला मंगळ आहे. अहिंसा, संयम आणि तप हाच खरा धर्म आहे. जे धर्मात्मा आहेत आणि त्यांच्या मनात नेहमी धर्म असतो. त्यांना ईश्वरही नमस्कार करत असल्याचे महावीर म्हणतात. भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनात धर्म, सत्य, अहिंसा, ब्रम्हाचार्य आणि अ‍परिग्रह दयेवर अधिक भर दिला आहे.

त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील आणि सदाचार हे त्यांच्या प्रवचाचे सार होते. त्यांनी चतुर्वेद संघाची स्थापना केली. देशातील विविध भागात फिरून त्यांनी आपल्या पवित्र संदेशाचा प्रचार आणि प्रसार केला. भगवान महावीरांनी वयाच्या 72 व्या वर्षी इ.स. पूर्व. 527 मध्ये कार्तिक कृष्ण अमावस्येला पावापुरी येथे समाधी घेतली.

वेबदुनिया वर वाचा