शरीराला निरोगी ठेवण्यासाठी स्वस्तिकासन करा

शुक्रवार, 11 जून 2021 (16:50 IST)
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी काही योगासन आहेत ज्यांना करून आपण मानसिक आणि शारीरिकरीत्या निरोगी राहू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या आज स्वस्तिकासना बद्दल हे आसन करून आपण निरोगी राहू शकतो.चला हे करण्याची कृती आणि फायदे जाणून घेऊ या.
 
कृती- 
सर्वप्रथम एका चटई वर पाय पसरवून बसा.डावा पाय गुडघ्यापासून दुमडून उजवी पायाची मांडी आणि पोटऱ्यांना असं ठेवा की डाव्यापायाचे तळपाय लपतील.नंतर उजव्या पायाचे तळपाय डाव्या पायाच्या खालून मांडी आणि पोटऱ्यांच्या मध्ये असे ठेवल्याने स्वस्तिकासनाची मुद्रा बनेल.ध्यानाच्या मुद्रेत बसा आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. दीर्घ श्वास घेत श्वास रोखून ठेवा. याच प्रक्रियेची पुनरावृत्ती पाय बदलून करा.
 
स्वस्तिकासनाचे फायदे -
* पायाची वेदना,घाम येणंकमी होत.
* तळपाय थंड होणं किंवा तळपायाची जळजळ कमी होते.
* ध्यान करण्यासाठी हे उत्तम आसन आहे. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती