अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

शुक्रवार, 10 मे 2024 (06:46 IST)
सातूचे लाडू
साहित्य: 250 ग्रॅम सत्तू पीठ, 250 ग्रॅम पिठी साखर, 100 ग्रॅम तूप, 1 चमचा वेलची, चिरलेला सुका मेवा
 
पद्धत: एका भांड्यात सत्तूचे पीठ चाळून घ्या. आता तूप वितळवून सत्तूच्या पिठात तूप, पिठी साखर आणि वेलची घालून मिश्रण हाताने सारखे मिक्स करा. आता त्यात चिरलेला ड्रायफ्रुट्स टाका आणि आवडीनुसार गोल लाडू बनवा. आता हे सत्तूचे लाडू नैवेद्य म्हणून देवाला अर्पण करा.
 
टीप: तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रत्येक लाडूवर एक बदाम देखील चिकटवू शकता.
 
************** 
 
आम्रखंड
साहित्य: ताजे दही - 2 1/2 कप (500 ग्राम), पिठी साखर - 1/4 कप, मँगो पल्प - 1 कप,  काजू - बादाम - 4, पिस्ता - 5-6, वेलची - 2
 
कृती : दह्याला जाड्या कापडात बांधून लटकवून ठेवा. दह्याचं सर्व पाणी निथरल्यावर दही घट्ट झाल्यावर एका भांड्यात काढावं. या दह्यात साखर घालून त्याला घोटून श्रीखंड तयार करावं. त्या मँगों पल्प, सुके मेवे, वेलची घालून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावं. वरुन पिस्ता घालून गार सर्व्ह करावं.
 
************** 
 
मखाना खीर
साहित्य- 1/2 कप काजू, 2 चमचे तूप, 1/2 टीस्पून वेलची पावडर, 3 कप दूध, साखर चवीनुसार, ड्राय फ्रुट्सचे तुकडे, सैंधव मीठ
पद्धत: 
1. मखाना आणि काजू एका कढईत थोडं तुप घालून भाजून घ्या आणि नंतर त्यावर थोडं सैंधव मीठ शिंपडा.
2. थंड होताच 3/4 मखना आणि काजू आणि वेलची ब्लेंडरमध्ये टाका. बारीक करा. 
3. अजून एक खोल पॅन घ्या, त्यात 2 ते 3 कप दूध घाला आणि उकळू द्या. 
4. त्यात साखर घाला, त्यानंतर मखानाचे मिश्रण घाला आणि चांगले मिसळा. 
5. आता उरलेला भाजलेला मखाना घाला. आणि त्यात काजू घाला. 
6. घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा. 
7. चिरलेल्या ड्रायफ्रुट्सने सजवल्यानंतर, तुम्ही खीर गरम किंवा थंड सर्व्ह करू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती